लढाई आर पार ची आता सुरु करणार- यशवंत पवार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लढाई आर पार ची आता सुरु करणार- यशवंत पवार

 

सोलापूर // प्रतिनिधी 

गेली अनेक वर्षा पासून पत्रकार संरक्षण कायदा
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन यादीवर नसलेल्या वृतपत्र ना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती अधिस्वीकृती बाबत जाचक अटी रद्द करणे राज्यातील सर्वच माध्यमाच्या पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजना मधून घरे उपलब्ध पत्रकारांना विमा योजना यासह राज्यातील युट्युब चॅनल व वेब पोर्टल ला शासकीय परवानगी व जाहिराती मिळणे बाबत कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत व वारसाना शासकीय सेवेत सामावून घेणे बाबत बातमी लावण्यावरून पत्रकारांना गंभीर मारहाण जीव घेणा हल्ला करणाऱ्या वाळू माफिया गुटखा माफिया यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई
व पत्रकारांच्या विषयावर आता आर पार ची लढाई करावीच लागणार त्याशिवाय पर्याय उरला नाही राज्यातील पत्रकारांच्या हल्ल्यात कमालीची वाढ झाली असून पत्रकार सुरक्षित राहिले नाहीत बातमी लावण्यावरून गंभीर हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून हा महाराष्ट्र की बिहार आहे? अशी परिस्थिती निर्माण झाली असून राज्यात पत्रकारांची नोंदणी नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध योजनेचा लाभ मिळत नसल्याने राज्यातील पत्रकार हवालदिल झालेले दिसत आहेत ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था अतिशय बिकट व वाईट असून आई जेऊ देईना बाप भीक मागू देईना अशीच दयनीय अवस्था झालेली असून अल्प मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांचे जीवन टांगणीला बांधले आहे.
आता पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे हवे असतील तर आर पार ची लढाई करावीच लागेल* त्याला पर्याय नाही कोरोना मुळे लॉक डाऊन संचार बंदी यासारख्या बिकट परिस्थितीत अनेक वृतपत्र बंद केल्याने अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या मोठया वृतपत्र समूहाणे पत्रकारांना वाऱ्यावर सोडल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे अश्या पत्रकारांना आधार देण्यासाठी काहीतरी केल पाहिजे संघर्ष केला पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच पत्रकार व पत्रकारिता जगेल अन्यथा परिस्थिती वाईट आल्याने अनेक पत्रकार आत्महत्या करतील
पत्रकार सुरक्षा समिती अनेक वर्षापासून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उपोषण निवेदन च्या माध्यमातून राज्य सरकार ला जाग आणण्यासाठी प्रयत्न करत असून पत्रकारांचे प्रश्न बाबत नेहमीच आवाज उठवत असून
आता पत्रकारांच्या प्रश्नासाठी आर पार ची लढाई करावी लागणार आहे
यशवंत पवार
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here