लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ ला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक
देशभरातील शंभर महिलांना लग्नाचे आमिष देऊन फसविणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ ला अखेर पिंपरी- चिंचवडमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे.
प्रेमराज थेवराज डिक्रूझ, रा. तमिळनाडू, असे त्या ‘लखोबा लोखंडे’चे नाव आहे. शंभर महिलांना त्याने कोट्यवधी रुपयांना फसविले आहे.अत्यंत सॉफिस्केटेड दिसणारा प्रेमराज हा अविवाहित आहे. तो खासकरून विधवा, परित्यक्ता महिलांना हेरून त्यांना प्रेमात पाडायचा. मी काँट्रॅक्टर आहे
बिझनेसमन आहे, बिल्डर आहे असे खोटे सांगून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्याचा प्रेमाचे नाटक करून लुबाडत असे.त्याने अनेक जणींसोबत साखरपुडाही केला असून अनेकींना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची माया गोळा केली आहे.मात्र एका महिलेने डिक्रूझ विरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला अटक केली.
पुणे, ठाणे, मालाड, मुंबई, तामिळनाडू, चेन्नई, गुजरात येथून फसविल्याच्या तक्रारी दाखल होत आहे. डिक्रूझकडे ७ मोबाईल, ३२ सिमकार्ड, दोन पॅन कार्ड, दोन आधारकार्ड आणि आणि बनावट पासपोर्ट मिळून आला आहे.