राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

सोलापूर // प्रतिनिधी 

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडून ऑनलाईन पध्दतीने पात्र व्यक्ति/संस्था/पशुपालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए.सोनवणे यांनी केले आहे.

बेस्ट डेअरी फार्मर रिरींग इंडिजेनिअस कॅटल ब्रीडस् या पुरस्कारासाठी नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस करनाल, हरयाना संस्थेच्या मान्यताप्राप्त 50 देशी गोवंशीयपैकी कोणत्याही जातीचे पशुधन व 17 म्हैस वर्गीय जातीपैकी कोणत्याही म्हैस वर्गीय जातीचे पालन, पोषण व संवर्धन करणारे पशुपालक/शेतकरी या पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने केंद्र शासनास प्रस्ताव सादर करु शकणार आहेत.

बेस्ट आर्टिफिसिअल इनसेमिनेशन टेक्निशिअन या पुरस्कारासाठी राज्यातील कृत्रिम रेतन करणारे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच दुधसंघामार्फत/सेवांभावी संस्थामार्फत अथवा खाजगीरित्या कृत्रिम रेतन करणाऱ्या संस्था अर्ज करू शकतात. त्यांनी कमीत कमी 90 दिवसांचे कृत्रिम रेतन प्रशिक्षण घेतलेले आहे, अशा उत्कृष्ट कृत्रिम रेतन करणाऱ्या पात्र व्यक्तिंनी पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत.

बेस्ट डेअरी कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर कंपनी/डेअरी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायजेशन पुरस्कारासाठी सहकार/कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत व स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या सर्व सहकारी दुग्ध सोसायट्या / शेतकरी उत्पादक संस्था अर्ज करू शकतील. त्यांचे कमीत कमी 50 सभासद असतील आणि एका दिवसाला कमीत कमी 100 लिटर दूध संकलन करणाऱ्या संस्था पुरस्कारांसाठी ऑनलाईन पध्दतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करु शकतील.

पुरस्कारासाठी www.dahd.nic.in/MHA (www.mha.gov.in) या संकेतस्थळावर ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन ऑनलाईन पध्दतीने परिपूर्ण अर्ज 15 जुलै 2021 दुपारी 12.00 वाजलेपासून भरावेत. 15 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार आहे, जिल्ह्यातील संबंधित पात्र व्यक्ति/संस्था/पशुपालक यांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here