राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून “त्या” मुलांच्या अडचणी सोडविणार: श्रेयाताई भोसले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून “त्या” मुलांच्या अडचणी सोडविणार:श्रेयाताई भोसले

 

सोलापुर // प्रतिनिधी

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री .अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संसद रत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी जिवलग योजना सुरु केली आहे.

कोरोनाच्या काळात ज्या मुलांची आई वडील मरण पावले आहेत त्या मुलांची जबाबदारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आली या मुलांच्या शैक्षणिक काही अडचणी असतील किंवा शासकीय काही योजना असतील या मुलांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी राष्ट्रवादी युवक व युवती पक्षाचे दूत त्या मुलांच्या घरापर्यंत सर्व योजना पोहोचतील व त्यांना मायेचा आधार देतील व त्या मुलांना आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानून त्या मुलांविषयी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतील आज स्वत: खासदार संसद रत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांनी त्या मुलांशी संवाद साधलेला आहे, खरंच त्या मुलांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पुळूज या गावी राष्ट्रवादी युवक दूत म्हणून मा. श्री .अरुणजी आसबे साहेब व राष्ट्रवादी युवती दूत म्हणून श्रेया ताई भोसले तसेच गावचा सरपंच म्हणून मी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी उपस्थित होतो मा.श्री.झाकीर मुलांणी मा. श्री.राजाराम बाबर मा.श्री.भारत पाटील व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते खरंच त्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here