राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले,तर तालुकाध्यक्षपदी संदीप मांडवे यांची निवड!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले,तर तालुकाध्यक्षपदी संदीप मांडवे यांची निवड!

मुळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले तर तालुकाध्यक्षपदी संदीप मांडवे यांच्यासह पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी दिगंबर सुडके, मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रथमेश पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या विविध प्रकारच्या पदांसाठी मुलाखती घेतल्या होत्या. तद् अनुषंगिक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाच्या भवितव्याचा, पक्षवाढीसाठी साकल्याने विचार करून पंढरपूर शहराध्यक्षपदी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले तर तालुकाध्यक्षपदी संदीप मांडवे यांच्यासह पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी दिगंबर सुडके, मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रथमेश पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा केली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीत पक्षाला विजयश्री खेचून आणण्यासाठी, नगरपालिकेचा दांडगा अनुभव व पंढरपूर नगरपालिकेची इंतभूत माहिती असलेले पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले यांची पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड जाहीर करून, नगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीला आगळावेगळा आयाम देण्याचे काम जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील धडाडती मुलूख मैदानी तोफ व एकमेवाद्वितीय आंदोलक संदीप मांडवे यांची पंढरपूर तालुकाध्यक्षपदी निवड करून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा समोर ठेवल्याचे स्पष्ट दिसून येते. पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी दिगंबर सुडके यांची निवड करून, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बळीराम साठे यांनी निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी प्रथमेश पाटील यांची निवड करून, कै. पी.बी. पाटलांच्या वारसांना राष्ट्रवादी काँग्रेस वार्‍यावर सोडणार नाही, याची हमी देत मंगळवेढा तालुक्याकडे शरद पवार हे विशेष लक्ष देणार असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिले आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here