राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत बँकेवर ED ची धाड; कोल्हापुरात खळबळ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबधीत बँकेवर ईडीने धाड टाकली हे. या घटनेमुळे  कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. 

हसन मुश्रीफ चेअरमन असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने धाड टाकली आहे.  बुधवारी सकाळीच ईडीचे अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले. ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेतील कागदपत्राची तपासणी करत आहेत.  हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे या साखर कारखान्यात देखील ईडीचे अधिकारी पोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांच्या घरावर, त्यांचे निकटवर्ती असणारे सहकारी आणि जावई यांच्या घरावर ईडीने धाड टाकली होती, त्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने धाड टाकून कागदपत्राची तपासणी सुरू केली आहे. 

*ईडीच्या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीम यांची  14 तास चौकशी*

यापूर्वी 12 जानेवारी 2023 रोजी  हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरी ईडीचे (Hasan Mushrif Kagal Home ED Raid) अधिकारी दाखल झाले होते. तब्बल 14 तास  हसन मुश्रीम यांची चौकशी सुरु होती. हसन मुश्रीफ यांचे पुण्यातील पार्टनरल चंद्रकांत गायकवाड यांच्या ऑफिसवरही ईडीने धाड टाकली होती. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ऑफिसवर ईडीने छापे टाकले होते. कोलकात्याच्या कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

*किरिट सोमय्या यांनी केले होते घोटाळ्याचे आरोप*

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. घोटाळ्याचे आरोप करत सोमय्या यांनी मुश्रीफांच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. मुश्रीफांच्या शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्र दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप होता. दरम्यान या कारखान्यांशी आपला काही संबंध नाही, असा दावा मुश्रीफ यांनी केला होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here