राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त टाकळी सिकंदर येथे स्वच्छता मोहीम : सुनील चव्हाण
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा
देशाचे राष्ट्रनेता मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या दरम्यान भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने मोहोळ तालुक्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला आहे.
या सेवा पंधरवडा अंतर्गत 1आक्टोंबर 2023 रोजी टाकळी सिकंदर येथे हनुमान मंदिर. ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र,महादेव मंदिर,मलिक साहेब,सिकंदर साहेब दरगा सर्व गावांतर्गत रस्ते, पशुवैद्यकीय दवाखाना,याचबरोबर टाकळी सिकंदर भीमा कारखाना परिसरातील शिवाजी चौक व परिसरात टाकळी सिकंदर फुलचिंचोली आडेगाव पटकुल या परिसरातील सर्व ग्रामस्थ व महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मदतीने स्वच्छता दूतांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी अंदाजे 10 टण ओला व सुका कचरा गोळा करण्यात आला तसेच मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
याप्रसंगी मोहोळ तालुका भाजप अध्यक्ष सुनील (दादा) चव्हाण, डॉ. खुणे,भाऊसाहेब सोनटक्के, विशाल सोनटक्के,सरपंच तुकाराम चव्हाण, ग्रामसेवक महामुनी,उपसरपंच शिराज तांबोळी, बशीर मुजावर, श्रीमती मंगलताई ओव्हाळ, डॉ.देशमुख सर्व अंगणवाडी सेविका शिक्षक वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी आदी बहुसंख्याने लोक उपस्थित होते.