राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या जीवनावर दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रपिता गांधीजीच्या १५३ वी जयंतीनिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रम

राष्ट्रनेता से राष्ट्रपिता व सेवा पंधरवड़ा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

अककलकोट, दि. ३० : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती हा कालावधी “सेवा पंधरवड़ा” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, जिल्हा प्रशासन, सोलापूर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान, अक्कलकोट यांच्या संयुक्‍त विदयमाने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधीजीच्या जीवनांशी संबधित महत्वपूर्ण घटना, त्यांनी भेट दिलेल्या व सत्याग्रह केलेल्या ऐतिहासिक स्थळाविषयी माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 01 ते 03 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वाहनतळ जवळील जागेत आयोजित करण्यात आले आहे.

          प्रदर्शनचे उदघाटन दि. 01 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सोलापूर लोकसभा खासदार मा.डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, मा. आमदार श्री सचिन कल्याणशेट्टी आणि मा. जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थानचे चेयरमन महेशराव इंगळे आदि मान्यवरांच्या उपस्थित उदघाटन होणार आहे.

           हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असेल. या प्रदर्शनमध्ये महात्मा गांधीजी आणि अन्य राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील महत्वपूर्ण माहिती चित्रमय आणि मजकूर रुपाने प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना बघता येईल.

          राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या संकल्पनेवर आधारित सेवा पंधरवड़ा निमिताने महाराष्ट्र राज्य शासनाकडून 14 सेवांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सदरील सेवा पंधरवडाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनामध्ये तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, पोलिस विभाग आणि महावितरण आदि विभागाचे माहिती स्टॉल्स लावण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावे असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यानी केले आहे. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here