राज ठाकरेंच्या वाढदिवसांचे औचित्य साधत वृध्द माता-पित्यांना कपडयांचे वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज ठाकरेंच्या वाढदिवसांचे औचित्य साधत वृध्द माता-पित्यांना कपडयांचे वाटप

 

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूरसह सोलापूर जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, निराधारांना अन्नदान. तर वृध्द माता-पित्यांना कपडे वाटप करण्यात आले असल्यांची माहीती मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस सर्वत्र समाजोपयोगी कार्यक्रम करून साजरा करण्यात आला. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील आयटीआय कॉलेज याठिकाणी 300 वेगवेगळया देशी झाडांची लागवड करण्यात आली. तसेच कुष्ठरोगी वसाहत आणि बेघर निवारा केंद्रामध्ये मिष्टान्न भोजन देखिल मनसेच्या वतीने वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने गोपाळूपर येथील मातोश्री वृध्दाश्रमांतील वृध्द माता-पित्यांची गरज ओळखून त्यांना कपडयांचे वाटप करण्यात आले. यामध्ये साडया, धोतर, टॉवेल अशा दैनंदिन कपडयांचे वाटप झाले. तसेच याठिकाणीही अन्नदान मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या गरजू कुंटुबियांना देखिल मदत  करण्याचा निर्धार यानिमित्ताने धोत्रे यांनी जाहीर केला.

याप्रसंगी दिलीप धोत्रे बोलताना म्हणाले, कोरोनासारख्या महामारीमधून सर्वत्र जात आहेत. अशातच समाजाप्रति दिशादर्शक कार्य करण्यांची प्रेरणा कायमच मनसैनिकांना राजसाहेब ठाकरे यांच्याकडून मिळत आली आहे.यांचाच भाग म्हणून राजसाहेबांच्या वाढदिनी समाजोपयोगी विधायक कार्यातून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.  

यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,सहकार सेना जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ,उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष गणेश पिंपळणेरकर, तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, विदयार्थी सेना अध्यक्ष प्रताप भोसले, स्वपिल जाधव, तेजस गांजले,सिद्धनाथ गायकवाड, धनाजी चव्हाण,  हेमंत पवार,  ओंकार गुरव,लखन घाडगे विक्रांत तिखुटे, नागेश इंगोले  ,सज्जन मस्के, मारुती एवळे, शिवाजी राऊत, तेजश भोसले, आदर्श गुरव रुषिकेष गुरव,प्रथमेश पवार, श्री पाटील सर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here