राज्यातील ९ साखर कारखान्यांना १०३१ कोटी रुपये कर्ज देण्यात येणार सोलापूर जिल्ह्यातील “या” दोन सहकारी साखर कारखान्याचा समावेश!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्यातील ०९ साखर कारखान्यांना १०३१ कोटी रुपये कर्ज देण्यात येणार आहे. त्यांसदर्भातील टिपणी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) आलेली आहे. राज्यातील नऊ कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे.

राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून (एनसीडीसी) राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १०३१ कोटी रुपये मंजूर असून यामध्ये गणेश सहकारी साखर कारखाना, पद्यश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखाना (दोन्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित), शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी (आमदार अभिमान्यू पवार), रामेश्वर सहकारी साखर कारखाना (केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे), कर्मवारी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना (दोन्ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील), शंकर सहकारी साखर कारखाना (आ. रणजितसिंह मोहिते पाटील), वैद्यनाथ साखर कारखाना (पंंकजा मुंडे), भीमा सहकारी साखर कारखाना (खासदार धनंजय महाडिक) या कारखान्यांचा समावेश आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here