राजाराम कारखाना निवडणूक-विरोधकांचा कंडका पडला; महादेवराव महाडिकांनी गुलाल उधळला

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

छत्रपती राजाराम कारखान्याचा पहिला निकालात संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिकांनी दणदणीत विजय मिळवला. महादेवराव महाडिकांना 129 पैकी महाडिक यांना 84 मते पडली. तर विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना 44 मते पडल्याची माहिती समोर आली आहे.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत नऊ पैकी सहा गटांमध्ये महाडिक गटाने आघाडी घेऊन आपला विजय निश्चित केला. आतापर्यंत एकूण पाच फेऱ्या झाल्या असून महाडिक गटाचे १३ जण आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता महाडिक गटाची विजयाकडे घौडदौड सुरु झाली आहे

महादेव महाडिकांनी आजच्या विजयाचे श्रेय खासदार धनंजय महाडिक आणि अमल महाडिकांना दिले. तसेच हा विजय हा सर्वसामान्य सभासदांचा विजय असून या विजयाने कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल. अशी भावनाही व्यक्त केली आहे. त्याचवेळी ज्यांना शड्डू ठोकरता येत नाही ते रिंगणात उतरले. विरोधकांनी द्वेषभावनेतून आमच्यावर निवडणूक लादली, विरोधकांना पैशाची मस्ती होती. अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

छत्रपती राजाराम कारखान्याच्या निकालाकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले होतं. विरोधक आणि कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमच्यावर निवडणूक लादली. त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागत आहे. सभासदांसमोर त्यांनी विखारी प्रचार केला. वैयक्तिरित्या चारित्र्य हननाचा प्रचार केला. पण सभासदांनी विकासाला कौल दिला.

माजी पालकमंत्री आणि त्यांच्या बंधूंनी ज्या सहाकारी संस्था बळकावल्या, त्यातून भ्रष्टाचार करुन जो पैसा कमावला तो पैसा राजाराम कारखान्याच्या सभासदांना देऊन त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण कारखान्याच्या स्वाभिमानी जनतेनं त्यांना झिडकारलं त्या सर्व सभासदांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अशा शब्दांत अमल महाडिकांनी यावेळी विरोधकांवर टिका केली आहे.

तसेच, राजाराम कारखान्याच्या सर्व सभासदांसह ज्यांनी या निवडणुकीत सहकार्य केलं त्यासर्वांना आपण हा विजय समर्पित करत आहोत. त्या सर्वांच मी मनापासून आभार मानतो, अशी भावना व्यक्त करत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्यांना आणि विरोधकांना त्यांच्या पैशाची मस्ती आहे. कमावलेल्या काळ्या पैशातून सभासदांना विकत घेण्याची त्यांची वृत्ती सभासदांनीच पाहिली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here