रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार रविंद्र वायकर यांनी पुरग्रस्तांना दिला एक हात मदतीचा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार रविंद्र वायकर यांनी पुरग्रस्तांना दिला एक हात मदतीचा

खेड बिरमनी येथे दरड कोसळून आई वडिलांचा मृत्यू झालेल्या कुटुंबाला केली 1लाख रूपयांची मदत

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

मुंबई:- कोकणात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. या पुरात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच खेड बिरमनी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून शिवसैनिक जयवंत भाऊराव मोरे व ललिता जयवंत मोरे या पती पत्नीला आपला जीव गमवावा लागला. अशी माहिती मिळाली आणि रविंद्र वायकर तातडीने पुरग्रस्तांच्या मदतीला कोकणात गेले. तेव्हा मृत शिवसैनिक जयवंत मोरे यांचा मुलगा अनंत याची भेट घेतली आणि त्याला 1 लाख रूपयांची मदत केली.जयवंत मोरे हे आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक होते. खेड येथील दुर्घटनेत त्यांच्या या दुर्दैवी मृत्युमुळे जोगेश्वरी विभागातील सर्व शिवसैनिकांना अतिशय दुःख झाले. या दुर्घटनेत त्यांचे बिरमनी येथील घराचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपल्या आई-वडीलांची आठवण म्हणुन त्यांचा मुलगा अनंत याला बिरमनी गावातील पडलेले घर पुन्हा बांधण्यासाठी सहाय्य व्हावे यासाठी आमदार रविंद्र वायकर यांनी खेड बिरमनी येथे जाऊन त्याला एक लाख रूपयांची रोख रक्कम देऊन मदत केली. त्याबरोबरच घरातील वस्तूंची देखील नासधूस झालेल्या या कुटुंबाला इतर जीवनावश्यक वस्तूही रविंद्र वायकर यांनी दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here