योग विद्या धाम पंढरपूर, रोटरी क्लब व लायन्स क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक योग दिन साजरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

योग विद्या धाम पंढरपूर, रोटरी क्लब व लायन्स क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक योग दिन साजरा

जलनेती या शुद्धिक्रियाचे अभियान व प्रशिक्षण पंढरपूरात मोफत राबवणार

सोमवार २१ जून रोजी जागतिक योग दिन निमित्त योग विद्या धाम पंढरपूर,लायन्स क्लब,रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सावरकर वाचनालय, प्रभा हिरा प्रतिष्टान, शिंदेशाही, अरिहंत पब्लिक स्कुल, द.ह.कवठेकर प्रशाला येथे साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन करुन, ओंकार प्रतिमा व योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सौ.विजया नाईक यांनी योगगीत सादर केले.शासनाच्या प्रोटोकॉल मधील योगासने, जलनेती प्रात्यक्षिका शिवाय कोविड साठी उपयुक्त ठरलेल्या भ्रामरी प्राणायाम व दीर्घश्वसनाचे शास्त्रीय प्रशिक्षण योगतज्ञ अशोक ननवरे यांनी सदर वर्गात घेतले. व्हर्चुअल झुम अँप च्या माध्यमातून व फेसबुक च्या मदतीने हजारो नागरिकांनी, योग साधकांनी योगा वर्गचा लाभ घेतला. योग गुरु अशोक ननवरे यांनी योगा व प्राणायाम यांची माहिती सांगितली. पुढील १० दिवस कोविड पार्श्वभूमीवर उपयुक्त ठरत असलेली जलनेती ही शुद्धीक्रिया मोफत शिकवली जाणार आहे त्यासाठीचे साहित्य जलनेती पात्र मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले. योग विद्या गुरुकुल ,नाशिक विद्यापीठातर्फे सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंढरपूरातील ज्या नागरिकांना जलनीती शुद्धीक्रिया शिकायची आहे त्यांनी संपर्क करावा असे आवाहन केले तसेच योग शिक्षक यांना रोटरी क्लब पंढरपूर व लायन्स क्लब पंढरपूर यांच्यावतीने योगा मॅट व योगा साहित्य भेट देण्यात आले व उपस्थित योग साधकांना जलनेती या शुद्धिक्रिये साठी लागणारे साहित्य भेट देण्यात आले. रोटरी क्लबचे नुतन अध्यक्ष किशोर निकते यांनी सांगितले की यापुढेही सदर अभियानास आपण मदत करु. नियमीत योगा प्राणायाम मेडीटेशन केल्यास माणसाची शारिरिक व मानसिक तंदुरुस्त राहुन तो कोणत्याही संकटावर मात करु शकतो असे नुतन लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी यांनी सांगितले व योगा प्राणायाम शिकवण्यासाठी व जनजागृती मोहीमेसाठी निश्चितच लायन्स संस्था योगा प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या मदतीस पुढे राहतील असे सांगितले. ऑनलाईन होस्ट म्हणून योगशिक्षक किशोर ननवरे यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन योग शिक्षिका सौ.प्रिया विभूते यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगशिक्षक शाहुराजे जाधव, विष्णु देठे, आशीष शहा, योग शिक्षिका संगीता ननवरे, निता जामदार गुजराथी, स्वाती ननवरे आदींनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here