येत्या सात ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरांत बरोबर तीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेले महालक्ष्मी अंबाबाई चे मंदिर भाविकांनसाठी खुले होणार!
(मंदिर प्रशासनाकडून नियमावली जाहीर)
कोल्हापूर // प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदीरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील श्री अंबाबाईचे मंदीरही भाविकांसाठी खुले होणार आहे. याबाबत मंदीर प्रशासनाने याची जय्यत तयारी सुरु केली असून भाविकांसाठी काही नियमावलीही तयार केली आहे.
सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अंबाबाई मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. अंबाबाई पालखी सोहळा हा मंदीरातच मानकऱ्यांच्या हस्ते घेतला आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी दोन रांगांचे आयोजन केले असून बाहेर गावच्या भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांनी मंदीरात येताना सोबत पुजेचे अथवा कुठलेही साहित्य आणू नये.
तसेच दर्शन रांगेसाठी भाविकांना बॅरिकेट्स मधूनच जावे लागणार असल्यामुळे त्यांना मंदीर परिसरात फिरता येणार नसल्याचे मंदीर प्रशासनाने सांगितले.