युवा नेते सम्राट बाबा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमिती सदस्य तसेच महाडिक युवा शक्तीचे संस्थापक युवा नेते मा. जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांचा वाढदिवस रविवारी (ता.19) उत्साहात केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी दिली.

ते म्हणाले, शिराळा व वाळवा तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विधायकता जपत शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांवर भर आहे. पेठ येथे क्रिकेट स्पर्धा, ओव्यांच्या स्पर्धा, शालेय उपयोगी साहीत्याची वाटप, मराठी शैक्षणिक संकुलात बुद्धिबळ ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धां सह नेक्सस -2K21 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पोस्टर प्रदर्शन, रोबो रेस, क्विझ कॉन्टेस्ट, ट्रेझर हंट अशा तांत्रिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

वाळवा शिराळा को. ऑप डेअरीच्या वतीने जनावरांच्या दूध वाढी संदर्भात शेतक-यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मांगले येथे पशुप्रदर्शन, शिराळा येथे वृक्षारोपण व रूग्णांना फळे वाटप, इस्लामपूर येथे महाडिक युवाशक्तीच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच रक्तदान करणा-या व्यक्तीस तीन लिटर पेट्रोल देण्यात येणार आहे. ओसवाल ग्रुपतर्फे मल्लखांब स्पर्धा, मोमीन मोहल्ला येथे वहीतुला, इस्लामपूर मूकबधिर विद्यालयात वृक्षारोपण जिल्हा परिषद शाळा व सरकारी दवाखान्यामध्ये रूग्णांना खाऊ वाटपाचे आयोजन आहे. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सम्राट महाडिक पेठ नाका येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. शैक्षणिक साहित्य शालेय उपयोगी वस्तू द्याव्यात, असे आवाहन संयोजन समितीने केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here