सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ तालुका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मोहोळ विधानसभा मतदार संघातून गत पंचवार्षिक निवडणूक लढवलेले श्री.संजय (आण्णा) क्षीरसागर व नागनाथ (आण्णा) क्षिरसागर यांच्या मातोश्री अन्नपूर्णा दत्तात्रय क्षिरसागर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.यामुळे क्षिरसागर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रसंगी भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.खा.धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडीक यांनी आज क्षिरसागर परीवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी भीमा कारखान्याचे व्हा चेअरमन सतीश आण्णा जगताप, सुशील भैया क्षिरसागर,भीमा परिवाराचे संघटक समन्वयक तथा किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम दादा चव्हाण, पै.राजाराम बाबर,भारत पाटील,जनसंपर्क अधिकारी बंडू साहेब शेख,पै.प्रमोद बाबर,पै.झाकीर
मुलाणी,सतीश पाटील, रामभाऊ चव्हाण, प्रमोद बाबर मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व भीमा परिवाराचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.