यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत गावंधरे बिनविरोध! (यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंतभाऊ पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था भोसे (ता. पंढरपूर) या संस्थेच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा जयवंत गावंधरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील यशवंतभाऊ पाटील ग्रामीण पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

यामध्ये जयवंत गावंधरे, शहाजी पाटील, बळीराम पाटील, युवराज कोरके, तानाजी गावंधरे, भगवान काशीद, अशोक गावडे, इलाही मुलाणी, दादा शिंदे, नंदा तळेकर, गीता झेंडे हे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

नूतन अध्यक्ष निवडीसाठी आज संस्थेच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्वांनुमते जयवंत गावंधरे यांचीच अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी नूतन अध्यक्ष आणि सर्व संचालकाचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यासी अधिकारी श्री. पी.सी.दुरगुडे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले.

या निवडीवेळीभोसे येथील यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे नूतन चेअरमन जयवंत गावंधरे यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, सुनिल कोरके,संस्थेचे सचिव नागनाथ भांडे यांच्यासह पतसंस्थेचे सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here