२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघासाठी मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक राजु खरे यांनी संपूर्ण मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला गाव भेट दौरा सुरू केला असून, या गाव भेट दौऱ्या प्रसंगी त्यांनी, मोहोळ तालुक्यातील बेगमपूर, वरकुटे, टाकळी सिकंदर, वडदेगाव, याचबरोबर इतरही सर्व गावांमध्ये सर्व नागरिकांचे संवाद साधून सर्व आपल्या अडीअडचणी काय आहेत व त्याचे काय निराकरण करता येईल याची संपूर्ण माहिती घेऊन जागेवर चुटकीसरशी प्रश्न सोडवण्याची क्रिया उद्योगपती राजू खरे यांनी केली आहे.
याप्रसंगी त्यांनी मोहोळ तालुक्यातील विशेषता पंढरपूर-कुरुल रस्त्यावरती जे अनेक मोठमोठाले खड्डे पडले आहेत त्याला स्वतःचा निधी देऊन ते काम पूर्णत्वास नेले आहे त्याचबरोबर पाटकुल ते तारापूर या रस्त्याचे ही त्यांनी लोकार्पण केले आहे.
स्वखर्चातून मागील त्याला पाणी मागील त्याला रस्ता देण्याचे सामाजिक काम उद्योगपती राजू खरे यांनी मोहोळ मतदार संघात सुरू ठेवल्या असून आगामी काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार असल्याचे यावेळी राजाभाऊ खरे यांनी सांगितले. यावेळी, त्यांच्या दौऱ्याप्रसंगी विजुभाऊ खरे, वरकुटे येथील माननीय नेताजी आठवले, आयु संघर्ष आठवले माजी सरपंच बाळासाहेब आठवले ग्रामपंचायत सदस्य आठवले काका, प्रकाश दादा पारवे, (मोहोळ विधानसभा अध्यक्ष शिवसेना शिंदे गट) दादासाहेब पवार, सोलापूर जिल्हा उपप्रमुख शिवसेना शिंदे गट सुधीर भाऊ गोरे, उमाकांत करंडे, सुनंजय मस्के,मा.प्रभाकर ससाणे(अध्यक्ष),मा.बाळू गुंड, मा.शिवाजी काशिद,मा.बंडू काशिद, मा.ज्ञानेश्वर लोंढे,मा.महादेव बचुटे,मा.बापू कापसे (ग्रा.पं.सदस्य सिकंदर टाकळी),मा.साहिल ससाणे,(मोहोळ विधानसभा अध्यक्ष शिवसेना शिंदे गट)मा.प्रकाश दादा पारवे,या.दादासाहेब पवार (सोलापुर जिल्हा उपप्रमुख शिवसेना शिंदे गट),मा.सुधीर भाऊ गोरे(उत्तर सोलापूर तालुका प्रमुख शिवसेना शिंदे गट),मा.उमाकांत करंडे (उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख शिवसेना शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.