मोहोळ येथे भूसंपादन कक्ष सुरु प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी सुरु राहणार कक्ष प्रांताधिकारी गजानन गुरव यांची माहिती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ येथे भूसंपादन कक्ष सुरु प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी सुरु राहणार कक्ष प्रांताधिकारी गजानन गुरव यांची माहिती

 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मोहोळ –पंढरपूर-आळंदी पालखी मार्गासाठी मोहोळ तालुक्यातील 1 लाख 4 हजार 900 चौ.मी क्षेत्र संपादित होत आहे. तालुक्यातील बाधित खातेदारांच्या सोयीसाठी तसेच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तहसिल कार्यालय, मोहोळ येथे प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी भुसंपादन कामाकाजासाठी कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मोहोळ –पंढरपूर-आळंदी पालखी मार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मुख्य निवाड्यात 14 गटांचा समावेश असून यामध्ये 63 हजार 597 चौ.मी. क्षेत्र आहे. या बाधित क्षेत्राचा मोबदला 38 कोटी 33 लाख 18 हजार 841 इतका आहे आतापर्यंत 14 गटातील 29 हजार 425 चौ.मी क्षेत्राचे 16 कोटी 45 लाख 27 हजार 771 रुपये बाधितांना देण्यात आली आहे. तसेच कायदेशीरबाबीमुळे चार गटांचा 17, 898 चौ.मी. क्षेत्राची 11 कोटी 59 लाख 80 हजार 48 रुपये मोबदला रक्कम जिल्हा न्यायालय सोलापूर येथे वर्ग करण्यात आली आहे. उर्वरीत 17 गटांची 16, 247 चौ.मी. क्षेत्राचा मोबदला 10 कोटी 28 लाख 11 हजार 22 रुपये रक्कम बाधितांना अदा करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले..

तसेच पुरवणी निवड्यामध्ये 34 गटांचा समावेश असून, 41,303 चौ.मी क्षेत्राचा मोबदला रक्कम रुपये 17 कोटी 81 लाख 94 हजार 629 रुपये इतकी आहे. मोहोळ तालुक्यातील पुरवणी निवाड्याच्या मान्यतेसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ संबधित खातेदारांना नोटीसीव्दारे कळविण्यात येईल असेही श्री.गुरव यांनी सांगितले.

मोहोळ शहरातील बाधित खातेदारांनी भूसंपादन कामकाकाजासाठी उपविभागीय कार्यालय पंढरपूर येथे न येता प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 यावेळेत तहसिल कार्यालय, मोहोळ येथे भूसंपादन कक्षासी संपर्क साधवा असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here