लाकडी लिंबोणी च्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यातील पाण्यावर दरोडा टाकणाऱ्या पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
गेल्यावर्षी लोक भावना बघून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी हा निर्णय त्वरित मागे घेतला होता परत तोच निर्णय लाकडी निंबोणी उपसा सिंचन योजनेच्या नावाने तूच प्रस्ताव पुढे आणून त्याला 348 कोटी रुपयाची खर्चाची मान्यता देण्यात आली आहे. हा सरळ सरळ मोहोळ तालुक्याचा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शेतकऱ्याचा पाण्यावर टाकण्यात आलेला दरोडा असून अगोदरच मोहोळ तालुक्यातील आष्टी व शिरापूर उपसा सिंचन योजना, याचबरोबर मंगळ तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना उजनी डावा व उजवा कालवा अर्धवट आहेत त्याला पुरेसा निधी दिलेला नाही उजनी धरणातील पाणी वाटपातील नियोजन पूर्ण झाल्यामुळे आता त्यामुळे त्यातून कोणतेही नवीन पाणी वाटप करता येत नसल्यामुळे संपूर्ण राज्याचा कारभार हा अजित पवार यांच्याकडे असल्यामुळेच घाट घातला जात आहे.
या संपूर्ण निर्णयाला पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मूकसंमती दिल्यामुळे मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांनी सांगितले.
त्याचबरोबर आगामी काळात हा निर्णय रद्द न झाल्यास, मोहोळ तालुक्याला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या भीमा -सीना जोड कालवा भीमा उजवा डावा कालवा, आष्टी उपसा सिंचन योजना, शिरापूर उपसा सिंचन योजना, यांनाही पाणी कमी पडणार असून तालुक्यात भयानक अशी परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल याला सर्वस्वी विकास आघाडी सरकार जबाबदार राहील. हा निर्णय यापुढे लवकरात लवकर न रद्द केल्यास यापुढे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे रास्तारोको जेलभरो आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारचा असेल यावेळी सुनील दादा चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील (दादा) चव्हाण, पंकज चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते शंकर वाघमारे, शहराध्यक्ष सुशील (भैय्या) क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब तात्या जाधव, अतूल खुपसे, महेश सोहनी,शिवाजी गाढवे, यशवंत भुसे, सुखदेव चव्हाण, राहुल शिंदे, नवनाथ भुजंगा गावडे, श्रीकांत महादेव शिवपुजे,उत्तम यशवंत मुळे, आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी समर्थक व कार्यकर्ते या प्रसंगी तहसिल कचेरी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.