जनसामान्यांचे माजी आमदार रमेश कदम यांना अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर! (माजी आमदार रमेश कदम बाहेर आल्याने विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांना जामीन मंजूर झाल्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यातील त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमधून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. माजी आमदार रमेश कदम यांनी 2014 सालची मोहोळ विधान सभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली होती.
त्याचबरोबर त्यांनी मोहोळ मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील सर्व गोरगरीब मतदारांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती व मागील त्याला बोअर व व पाण्याची व्यवस्था केली होती.
आमदार रमेश कदम हे 2014 नंतर सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण तरुण पिढीच्या ओठावरचे प्रमुख नाव बनले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संपूर्ण दोन ते अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंढरपूर तालुक्याबरोबरच मोहोळ तालुक्यातील संपूर्ण नदी काठावरील वाळू माफियांचा खरपूस समाचार घेत या सर्व वाळू माफी यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा सोलापूर येथे मोठा मोर्चा काढून जाहीर निषेध केला होता.
त्यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वाळू माफी आणि हौदौस घातला होता. त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते त्यांनी लगेचच कुणाचाही मुलांचा न बाळगता तयार केले होते त्यामुळे कुठे ना कुठे आमदार रमेश कदम यांचे नाव घेतले जात होते.
आज त्यांना जो उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. त्याला मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधातील एका गटाने मदत केल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांकडून आज मिळाली.
यामुळे आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा माजी आमदार रमेश कदम हे निवडणूक लढवू शकतात व जिंकून येऊ शकतात अशा चर्चा त्यांच्या संपूर्ण मोहोळ त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व समर्थक कार्यकर्त्यांमधून बोलल्या जात आहेत.
एक मोठ्या मनाजवळ दिलदार मानाचा नेता अशी ओळख आमदार रमेश कदम यांची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नवे महाराष्ट्रामध्ये होती त्यांना काही आपल्या पक्षातील नेते मंडळींकडून, अडचणीत आणण्याचे काम करण्यात आले होते.
याबाबत सर्व गोष्टी मोहोळ तालुक्यातील सुज्ञ मतदारांना माहिती आहेत. आता आगामी मोहोळ तालुक्यातील निवडणुकांमध्ये आमदार रमेश कदम यांची जादू पुण्या एकदा दिसणार असल्याचे, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे..

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here