(सभासद नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आज दिनांक 05 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.राजेंद्र शेलार साहेब आणि सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मोहोळ येथें डिजिटल सदस्य नोंदणी अभियान बैठक पार पडली आहे.
या बैठकीमध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींवर प्रदेश सचिव राजेंद्र शेलार साहेबांनी मार्गदर्शन केले . ह्या बैठकीला तालुका अध्यक्ष सुरेश आप्पा शिवपूजे महाराज, शहराध्यक्ष किशोर राजे पवार,बिरासाहेब खरात, जिल्हाउप.अध्यक्ष राजेश पवार. अरुण पाटील राजशेखर पाटील. राजेंद्र सरजे जेष्ठनैत बाबासाहेब शिरसागर .दाजीसाहेब कोकाटे, अमोल मोरे, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना हरणमारे माजी सरपंच बिलाल शेख संजय आठवले राजन घाडगे केराप्पा गाढवे शिवाजी मोरे, भास्कर वडाव, महेश नेटके,यशोदा लोखंडे,रतन कसबे, निलेश जरग, गणेश शेटे, राहुल होनमाणे, नेताजी ताकमोगे, रफीक पटेल भाऊ पवार , सिद्राम पवार,ज्ञानेश्वर कदम. नागेश पवार संतोष चव्हाण कांतीलाल राऊत नामदेव खांडेकर .अविनाश भोसले, मिथुन पवार,आरिफ पठाण,प्रमोद घोडके. कादिर शेख, महादेव जवंजाळ, किरण तूप समुंदर, रमेश पवार ,बंडु सलगर ,भागवत गुरुव ,आनंद पवार. तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या बैठकीत सभासद नोदणी करताना कार्यकर्तेना येणाऱ्या अडचणी प्रदेश पातळीवर पाठपुरावा करून त्वरित सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन राजेंद्र शेलार साहेबांनी दिले तसेच काम करून कांग्रेस समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते काम केलं तर निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या काळात होणार असल्याचे मत जिल्ह्याध्यक्ष धवलंदादानी मांडले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार किशोर राजे पवार ह्यांनी केले.