पंढरपुरात निघालेल्या महंमद पैगंबर जुलूस मोठ्या थाटामाटात निघाला असता हजारो हिंदू-मुस्लिम बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने संत मुक्ताबाई मठासमोर स्वागत स्टेज व खाऊवाटप ठेवण्यात आलेला होता. याप्रसंगी श्री अभिजीत पाटील या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येकाला मलोमिलन करून गळाभेटी घेत सर्वांना शुभेच्छा देत होते
जुलूस पुढे जात असताना पाठीमागे पडलेला कचरा व साफसफाई करून एक स्वच्छतेचा संदेश या ऊरूसातील सदस्य करत असताना यामध्ये श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील यांनी देखील सहभागी होऊन स्वच्छता करण्यासाठी हातभार लावला.