मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाडमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 11 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाडमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 11 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर

मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळला. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 17 जण गंभीर जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास 16 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. ज्यामध्ये तीन लहान मुलं, तीन महिला आणि 10 पुरुषांचा समावेश होता. दरम्यान, या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. खबरदारी म्हणून इमारतही रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
दुर्घटनेतून रेस्कू करण्यात आलेल्या 8 लोकांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच इतर लोकांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
पोलिसांनी मध्यरात्री दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री जवळपास साडे अकरा वाजता घडली. सुरुवातील आसपासच्या लोकांनी एकत्र येत 16 जणांना रेस्क्यू केलं. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सध्या फायर ब्रिगेडची टीम आणि स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ बचाव कार्य सुरु केलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मालडमधील 4 मजल्याची इमारत 3 मजल्याच्या इमारतीवर कोसळली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच अद्याप बचावकार्य सुरु आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here