मुख्यमंत्र्यांनी भाजपचा “विनोद” केला ; काँग्रेस मंत्र्यांनी भाजपच्या आशेवर फेरलं पाणी:-राज्यमंत्री विश्वजीत दादा कदम
सोलापूर // प्रतिनिधी
कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सोलापूर दौर्यावर आले होते काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. यावेळी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या रावसाहेब दानवे यांच्या सोबत एका स्टेजवर वक्तव्य केले होते त्याचा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्न केला असता त्यांनी मुख्यमंत्र्यांना कधीकधी विनोद करण्याची सवय आहे त्यामुळे त्यांनी भाजपचा विनोद केला अशा शब्दात त्यांनी भाजपच्या आशेवर पाणी फेरलं, त्यासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल अशी भूमिका मांडली पहा विश्वजित कदम काय म्हणाले.