मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना पाठविले रुग्णालयात

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना पाठविले रुग्णालयात

 

आषाढी एकादशीला महापूजेसाठी जात असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफा जात असताना मोटार सायकळीवरून पडलेल्या दोन व्यक्तींना ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात पाठविण्याचे काम करून माणुसकीची दर्शन दाखविण्याचे काम केले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आषाढी वारीच्या महापूजेसाठी 19 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला जात असताना आजोती पाटीच्या आसपास अर्जुन दुर्योधन भोंगळे (वय 42 वर्षे), किरण दत्तात्रेय हेलाडे (वय 30 वर्ष दोघे रा. भैरवाडी ता नेवासा, जि. अहमदनगर) हे मोटारसायकल वरून पडुन जखमी झाले होते  ही बाब मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आली त्वरित त्यांनी त्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना रुग्णालयात पाठविण्याचे सूचना दिल्या.

शिवाय त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली ताफ्यातील गाडीतून जखमींना पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, शिवाय संतोष दुर्योधन भोंगळे (भाऊ), कैलास वाखुरे (मित्र) यांना त्यांच्या फोनवर घटनेची माहिती देण्याचे काम पोलिसांनी केले जखमींची प्रकृती स्थिर आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here