मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून तयार होणार आरोग्य मनुष्यबळ इच्छुकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुख्यमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमातून तयार होणार आरोग्य मनुष्यबळ इच्छुकांनी ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन

सोलापूर // प्रतिनिधी 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम आणला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असणाऱ्या शासकीय, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्याचे मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.           

जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/NppJHa48WwArbLQj8 या लिंकवर उपलब्ध असणाऱ्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती भरावी.            

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, (नॉर्थकोट) पार्क चौक, सोलापूर, दूरध्वनी क्र.0217- 2950956, ईमेल solapurrojgar1@gmail.com यावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here