मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई येथे उद्योजक राजाभाऊ खरे यांनी केला यथोचित सन्मान! (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री विठ्ठल चरणी घातले होते साकडे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई येथे उद्योजक राजाभाऊ खरे यांनी केला यथोचित सन्मान!

(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री विठ्ठल चरणी घातले होते साकडे)

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते तुळशीहारासह विठ्ठल रूक्मिणीची नयनरम्य मूर्ती भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो विविध सामाजिक उपक्रम राबवित हा वाढदिवस करण्यात येतो. या वाढदिवसाचे औचित्य साधून, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे यांनीही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले होते.

त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रसाद व तुळशीचा हार घेऊन उद्योगपती राजाभाऊ खरे हे मुंबईला रवाना झाले होते. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा तुळशीचा हार पांडुरंगाचा प्रसाद विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान मामा भुमरे, आमदार भरत शेठ गोगावले आमदार दिलीप लांडे याचबरोबर बहुसंख्य मोहोळ व पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी २४७, मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली असून ते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आ.भरत शेठ गोगावले, व संदीपान मामा भुमरे यांचे निकटवर्तीय समजले जातात.
त्यांच्या माध्यमातून त्यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा जोर लावला असून त्यांनी मागील आठवड्यातच मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी व गोपाळपूर येथील ग्रामपंचायत इमारतीसाठी जवळजवळ ०६ कोटी रुपयांचा निधी आणला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here