बार्टीच्या महासंचालकांना रुजू न करून घेण्याचे राज्य शासनाच षडयंत्र.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

बार्टीच्या महासंचालकांना रुजू न करून घेण्याचे राज्य शासनाच षडयंत्र.

सोलापूर // प्रतिनधी

वैद्यकीय रजा संपवून परत आलेल्या बार्टी महासंचालकांना मा.धम्मज्योती गजभिये यांना त्यांच्या पदावर रुजू करून घेण्याऐवजी जाणीवपूर्वक षड् यंत्र करून सक्तीच्या प्रतीक्षेवर ठेवण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भात लेखी आदेश जारी केला आहे, परंतु त्यांचे कोणतेही कारण दिलेले नाही. शासनाच्या या अजब निर्णयाविरोधात बहुजनांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) धम्मज्योती गजभिये यांनी कोरोना च्या काळामध्ये हे अतिशय उत्तम काम केले आहे, तसेच नुकत्याच UPSC च्या परीक्षेत बार्टीच्या 18 पैकी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ,एक कर्तृत्व दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे ,असे असताना त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईमुळे बहुजनांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे , जाणून बुजून एससी एसटीच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले जात आहे ,सामाजिक न्याय विभागाने काढलेला शासकीय आदेश तात्काळ रद्द करावा.

बार्टी ही राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाची स्वायत्त संस्था असून तिच्या विविध विभागामार्फत अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी 59 प्रकारच्या विविध कल्याण कारी योजना राबविल्या जातात, निधी उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश योजना बारंगळ्या आहेत त्यासाठी तात्काळ निधीची तरतूद करावी.

अन्यथा बहुजन समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलने संपूर्ण महाराष्ट्रात होतील याला राज्यसरकारच जबाबदार राहील.

 

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here