मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते विक्रमसिंह विलास पासले यांचा उत्कृष्ट कृषी युवारत्न म्हणून सन्मान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

२१ दिवसीय बूट कॅम्पचा समारोप समारंभ!

देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने गुणवंतांना ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ प्रदान करण्यात आली आहे. याअंतर्गत कृषी क्षेत्रातील ८० गुणवंतांना ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रिकल्चर’ फेलोशिप प्रदान करण्यात आली.

यापैकी ४० फेलोंच्या पहिल्या बॅच साठी दिनांक २७ डिसेंबर २०२१ ते दिनांक १९ जानेवारी २०२२ दरम्यान २१ दिवसांचा बूटकॅम्प बारामती येथे आयोजित करण्यात आला होता, त्याची सांगता आज झाली.

या बूटकॅम्प मध्ये एकूण निवड झालेल्या ८० गुणवंत फेलोंपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन कृषी गुणवंतांना कृषी युवा रत्न म्हणून सन्मानित करण्यात आले. या मध्ये प्रथम क्रमांक वाडीकुरोली, ता.पंढरपूर येथील *चि‌.विक्रमसिंह विलास पासले* यांनी पटकावला. त्यांना मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ३० हजार रुपये फेलोशीप देवून गौरविण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित दादा पवार, खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे, सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख मा.श्री.प्रतापराव पवार, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती चे चेअरमन मा.श्री.राजेंद्र दादा पवार, मा.सौ.सुनंदाताई पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री. विवेक सावंत, मा.आ.रोहित दादा पवार, उद्योजक मा.श्री. अजय शिर्के आणि मा.श्री.विजय शिर्के, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.निलेश नलावडे यांच्यासह फेलो उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here