मा.खा धनंजय महाडिक यांच्यावर भाजपाने सोपवली मोठी जबाबदारी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(आगामी निवडणुकांसाठी भाजपा देणार मा.खा.धनंजय महाडिकांना मोठी ताकद)
(मुंबई येथील झालेल्या बैठकीत झाला निर्णय)

मुंबई वृत्तसंस्था प्रतिनिधी

आज मुंबई येथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आगामी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांसाठी कोल्हापूरचे संसदरत्न माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जबाबदारी दिली असून भारतीय जनता पार्टीने आगामी सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा विजयरथ रोखण्याचे काम संसदरत्न माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवले आहे.

संसद रत्न माजी. खासदार धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक, यांनी आजपर्यंत आपल्या माध्यमातून जे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात काम केले आहे. त्याचबरोबर धनंजय महाडिक युवाशक्तीच्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील कामाच्या अनुषंगाने ही जबाबदारी दिली असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीसोबत त्यांची जी “नाळ” अत्यंत घट्टपणे जुळली असल्यामुळे सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय ताकद संपूर्ण महाडीक परिवाराची असल्यामुळेच ही मोठी जबाबदारी दिली आहे असल्याचे समजते आहे.

याबाबत भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटी बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच अंशी काही जणांची निवड झाल्यामुळे सुद्धा आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे तरी सद्यस्थितीला चित्र दिसत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here