मा.खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 120 बेड्सच्या भव्य कोविड केअर सेंटरचे लोकार्पण संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर येथे भाजपा ताराराणी आघाडी यांच्या वतीने भव्य कोविड केअर सेंटरचे लोकार्पण
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ श्री.चद्रंकांत (दादा) पाटील यांच्या वाढदिवसनिमित्य भाजपा प्रदेश प्रवक्ते संसदरत्न.मा.खा. धनंजय उर्फ मुन्ना महाडिक(साहेब) यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात टाकून समाजासाठी “जनसेवेचा वसा” अंगीकारत जनहितासाठी काम करत असून कोल्हापूरात 120 बेड्सचे भव्य कोविड केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.

यामध्ये 120 आॅक्सिजन रहीत बेड्स तसेच 20 बेड खास लहान मुलांसाठी राखीव असल्याची माहिती मा.खा.धनंजय महाडिक यांनी दिली.

यावेळी मा.समरजीतसिंह घाटगे,मा.सत्यजित नाना कदम मा.सुरेश हाळवणकर,सौ.शौमिकाताई महाडिक,स्वरूप महाडिक,मा.महेश जाधव,मा.राहूल चिकोडे, सुनील कदम, सुहास लाटोरे, सह भाजपाचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते                       

             

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here