मा. खासदार धनंजय महाडिक यांचे फेसबुक पोस्टद्वारे कोल्हापुरकरांना भावनिक आवाहन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

कोरोनाने महाराष्ट्रासह कोल्हापूरमध्ये ही धुमाकुळ घातला असून गेले तीन महिन्यापासून रुग्णांची संख्या दीड ते दोन हजारांच्या घरात गेली आहे. कोल्हापूरात कोरोनाचा मृत्यूदर दररोज मृत्यूसंख्याही ३० ते ५० असून दररोज होणारे हे मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरचा पॉझिटीव्हीटी रेट सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील निर्बंध जवळजवळ ९० दिवस होते.

या कालावधीत सर्व व्यापार,व्यवसाय ठप्प असल्याने व्यापारी आर्थिक अडचणीत आला असून वीजबील, गाळे भाडे, कर्ज हफ्ते भरायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प असल्यामुळे बहुतांश सर्व सामान्य हातावरचेपोट असणा-या काम करणा-यांच्या नागरीकांछ्या हाताला काम नव्हते परिणामी बेरोजगारीत वाढ झाली.

सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय सकाळी ७ ते संध्याकाळी ४ पर्यंत उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मा. खासदार धनंजय महाडीक यांची एक फेसबूक पोस्ट चर्चेत आली असून यामध्ये त्यांनी लोकांना आपल्या माणसांसाठी आपणच असे भावनिक आवाहन करून,आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी बांधवांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले आहे . सोशल मिडीयावर लोकांनी सुद्धा या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here