माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार:- बळीराम काका साठे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार:- बळीराम काका साठे

सदाशिवनगर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम संपन्न!

 

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित(दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे पहिल्यांदाच वृक्षारोपण वह्या व मास्क चे वाटप करून वाढदिवसाला स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानून माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन परिसरातील अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी सदाशिवनगर ग्रामपंचायतचे सदस्य व कार्यक्रमाचे आयोजक दादासाहेब पालवे व मदन सुळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वृक्षारोपण वह्या व मस्क वाटपाचे कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहोळ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यशवंततात्या माने होते यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील, माळशिरस तालुका पक्ष निरीक्षक निरंजन भूमकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर व सुरेशआबा पालवे पाटील, रोहित दादा विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन भानुदास पाटील, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष हनुमंतराव साळुंके पाटील, माजी संचालक विलास आद्रट ,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे, माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षयभैय्या भांड, माजी अध्यक्ष बाबासाहेब माने, पुरंदावडे सदाशिवनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरज दोशी, पंचायत समिती सदस्य अजय सकट, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस शामराव बंडगर, पंढरपूरचे धैर्यशील पाटील, कामगार नेते सुभाष आद्रट, सदाशिवनगर ग्रामपंचायत सदस्य तानाजी पालवे पाटील, आशुतोष धाईंजे, फोंडशिरस चे सरपंच पोपटराव बोराटे ,मेडद चे सरपंच युवराजतात्या झंजे, कदमवाडी सोसायटीचे चेअरमन महादेवराव कदम, पिंटू सालगुडे पाटील,जितेंद्र गुरव विष्णुपंत शिंदे मुकुंद ओव्हाळ अरुण गुरव, अशोकराव शिंदे, आदी मान्यवरांसह नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here