मार्चअखेरपर्यंतची वीज जोडणी ५०% भरा उर्वरीत माफ करणार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मार्चअखेरपर्यंतची वीज जोडणी ५०% भरा उर्वरीत माफ करणार

 

सोलापूर // प्रतिनिधी

कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून कृषिपंपाच्या वीज बिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ९३० कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सध्या ४७७ कोटी १९ लाखांचे चालू वीज बिल व ३५७२ कोटी ८४ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. योजनेनुसार येत्या मार्चपर्यंत यातील ५० टक्के रक्कम व चालू वीज बिल भरल्यास उर्वरित ५० टक्के थकीत रक्कम माफ होणार आहे. मात्र, योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ५६९ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ३२ कोटी ९३ लाख व चालू वीज बिलांच्या १०३ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ७३७ कोटी ५५ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ९ हजार १८५ शेतकरी वीज बिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीज बिल व थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा एकूण ३७ कोटी ९५ लाख रुपयांचा भरणा केला आहे, तर २७ कोटी ८३ लाख रुपयांची अतिरिक्त सूट घेऊन संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here