मानाच्या पालख्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर दिंडी सोहळ्यांना वाहनाने परवानगी मिळावी:-हभप गणेश महाराज शेटे (अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा करण्यात येईल!)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मानाच्या पालख्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर दिंडी सोहळ्यांना वाहनाने परवानगी मिळावी:-हभप गणेश महाराज शेटे
(अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा करण्यात येईल!)

 

सोलापूर // प्रतिनिधी

पुणे येथे विधान भवन मध्ये पालखी सोहळ्याच्या प्रशासकीय मीटिंगमध्ये विश्व वारकरी सेनेच्या वतीने सोरभ राऊत विभागीय आयुक्त,मनोज लोहीया डी आय जी,कृष्ण प्रकाश एस पी यांच्या कडुन उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात आले असून सरकारला विनंती करण्यात आलेली आहे आपण ज्याप्रमाणे मानाच्या नऊ पालक यांचा विचार करीत आहात त्याप्रमाणे महाराष्ट्रात बऱ्याच दिंड्या पायदळ जाणाऱ्या आहेत आम्हाला मानाच्या पालखी च्या व्यतिरिक्त आम्ही इतर दिंडी सोहळ्या करिता पायदळ वारी व्हावी असा अजिबात आग्रह करीत नाही पण त्यांची वाहनाने अगदी मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थित वारी व्हायला पाहिजे याकरिता विदर्भा मधून चाळीस दिंड्या पायदळ जातात आणि त्यामधील काही दिडी समितीचे आम्हाला लेखी स्वरूपात पत्र आलेले आहे त्या पत्रामध्ये त्यांनी संघटनेच्या वतीने सरकारला विनंती करण्यास सांगितले आहे की मागील वर्षी आषाढी वारी मध्ये आम्हाला जाऊ देण्यात आले नाही पण या वर्षी एकता पालखी सोबत फक्त दहा वारकरी वाहनाने पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी आम्ही जात असताना कोरूना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आपणास देऊ, पंढरपूर मध्ये आम्ही आमच्याच मठात फक्त एक दिवस थांबणार आहोत, जाताना येताना आम्ही कुणाच्याही संपर्कात येणार नाही, आम्हाला तहसील कार्यालया मधून आमच्या वाहनाची पास काढून देण्यात यावी, ज्यांच्या जवळ वाहन पास राहील फक्त त्यांनाच पांडुरंगाचे दर्शन होईल, आम्हाला षष्टी पासून उत्तर पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवसाचे पंढरपूरचे वास्तव्य चालेल आणि आपण या व्यतिरिक्त जे काही नियम अटी लावाल ते आम्हाला सर्वमान्य राहतील अशा स्वरूपाचे लेखी पत्र आमच्याजवळ आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सरकारला नम्र विनंती करीत आहोत ज्याप्रमाणे मानाच्या पालखी सोहळा करीता आपण प्रशासकीय मिटिंग लावता त्याप्रमाणे विदर्भातील आषाढी वारीत पंढरपूरला जाणाऱ्या पालखी प्रमुख व प्रशासक यांची मीटिंग लावून त्यांच्या समस्या जाणून घेऊन वारी करता परवानगी देण्यात यावी व प्रत्येक पालखी सोहळा सोबत वाहन व भोजनाचा खर्च म्हणून प्रति पालखी सोहळा ला दहा हजार रुपये सरकारी मानधन देण्यात यावे ही विनंती विश्व वारकरी सेनेच्या वतीने करण्यात येत आहे आपण आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास आम्ही अमरावती येथील विभागीय आयुक्त समोर आमरण उपोषण करणार आहोत ज्याप्रमाणे आम्ही विदर्भा मधून प्रशासकीय मीटिंगची मागणी करत आहोत त्याप्रमाणे मराठवाडा ,खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण इथल्या संत मंडळींनी एकत्र येऊन दिंडीचे नियोजन केल्यास त्यांच्याकरिता ही प्रशासकीय मिटिंग घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात ही आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी मानाच्या नऊ पालख्यांचे दिंडी चालक,वेव्यवस्थापक, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर अध्यक्ष गहनीनाथ म हौसेकर व विश्वस्थ, चोपदार राजाभाऊ महाराज, चोपदार राम भाऊ महाराज, ह भ प श्री गणेश महाराज शेटे संस्थापक अध्यक्ष, महादेव महाराज इंगोले मार्गदर्शन, ह भ प दिनेश महाराज भामोदरे, योगेश महाराज तांबळे, पुरुषोत्तम महाराज हिंगरकर आदी संत मंडळी उपस्थित होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here