माध्यमिक शालांत परीक्षेत द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेचा निकाल 96% लागला आहे. प्रशालेतील 247 विद्यार्थ्यातील 237 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी संख्या 36 आहे. विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थी 108 आहेत.

प्रशालेची विद्यार्थिनी कु. वैष्णवी सिद्धेश्वर लेंगरे 99.40% प्रथम, कु. ऐश्वर्या महेश कुलकर्णी 98.80% द्वितीय, कु. आदिती धनाजी देशमुख 97.80% तृतीय,
कु.समीक्षा बाळासाहेब पिसे 97.20% चतुर्थ, चि.ओम मिलिंद वाईकर 96.80,% पाचव्या क्रमांकानी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नाना मालक कवठेकर, सचिव श्री एस. आर. पटवर्धन सर, श्री. सु.त्रिं. अभ्यंकर, चेअरमन विनाताई जोशी, पदाधिकारी श्री. एस. पी. कुलकर्णी सर, डॉ. अनिल जोशी सर, डॉ. मिलिंद जोशी सर, श्री. ऋषिकेश उत्पात, श्री. संजय कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.एम.कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक श्री. आर.जी.केसकर, पर्यवेक्षक श्री. एम.आर.मुंढे सर शिक्षक व शिक्षकेतर यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here