माता पित्यांची सेवा करा आयुष्यात कमी पडणार नाही – गणेश शेटे महाराज

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माता पित्यांची सेवा करा आयुष्यात कमी पडणार नाही – गणेश शेटे महाराज

 

पारस – स्वर्गीय दायमा महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त श्याम सुंदर गोरक्षण संस्थान पारस येथे ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांच्या रसमय वाणीतुन संगीतमय भागवत कथेच सहावा दिवस पार पडला असून पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या संख्येने अखंड हरिनाम सप्ताह चा आनंद घेत आहेत आज कथेमध्ये गणेश महाराज शेटे यांनी सांगितले माणसाचे सर्वात मोठे दैवत त्याचे माता पिता आहेत संत म्हणतात सकल तिर्थाचीये धुरे/जी एका माता पिता रे/तया सेवेसी शरीरे/लोन कीजे/ ज्या देशांमध्ये श्रावण बाळाने आई-वडिलांची सेवा केली आणि ज्या पुंडलिक राणी आई वडिलांची सेवा करून पांडुरंग परमात्मा त्या पंढरपूर नगरीमध्ये आई-वडिलांच्या सेवेच्या बळावर आणला त्याच देशांमध्ये वृद्धाश्रम उघडले जातात ही लाजिरवाणी बाब आहे. बऱ्याच ठिकाणी जन्मदात्या माय बापाची तरुण मुलं अवहेलना करतात एवढेच काय कुठे तर पारमार्थिक क्षेत्रात असणारे महाभाग सुद्धा आपल्या जन्मदात्या माय बापाची अवहेलना करतात. खऱ्या अर्थाने आपल्यावर सर्वात मोठे उपकार आपल्या आई वडिलांचे आहे ज्यांनी आपल्या करिता हाडाचे काळ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून आपल्याला लहानाचे मोठे केले पण माणूस मोठा झाल्यानंतर जन्मदात्या माय बापाचे उपकार विसरत आहे म्हणून माझी विनंती आहे एक वेळ पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला गेले नाही तरी चालेल घरी जन्मदात्या माय बापाची सेवा करा पांडुरंग आपल्या भेटीला आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही सध्या तरुण मंडळींनीया बाबीचा गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती कथेच्या माध्यमातून गणेश महाराज शेटे यांनी केली याप्रसंगी श्यामसुंदर गोरक्षण संस्थान चे अध्यक्ष गोयंनकाजी, आरुन महाराज लांडे, रमेश महाराज ईस्तापे, भगवान मेटांगे, सदुभाऊ लांडे यांचे विशेष सहकार्य लाभले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here