माजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक

(कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न)

सोलापूर // प्रतिनिधी

कर्मयोगी इंजिनीयरिंग कॉलेज शेळवे, पंढरपूर येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर चे ट्रस्टी श्री रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री एस पी पाटील यांनी भूषविले. कोरोंना च्या पार्श्वभूमीवर सदर चा मेळावा हा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.

“कर्मयोगी” अभियांत्रिकी महाविद्यालया चा नावलौकिक वाढविण्यात माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे तसेच माजी विद्यार्थ्यांच्या सूचना या संस्थेच्या विकासासाठी उपयुक्त असतात. त्या सूचना आमलात आणून संस्थेचा विकास साधता येणे शक्य होते असे प्रतिपादन संस्थेचे ट्रस्टी श्री. रोहन परिचारक यांनी मांडले.

महाविद्यालयातील शिक्षणानंतर आपापल्या ध्येयप्राप्ती च्या वाटेवर निघून गेलेले हे सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कॉम चे विभाग प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे यांनी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम विभागाच्या यशाचा चढता आलेख सादर केला. या विभागातील विद्यार्थी यशस्वी वाटचाल करीत असून नामांकित कंपनी मध्ये इंजिनीयर म्हणून काम करीत आहेत तर काही विदेशी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर काही शासकीय सेवेत कार्यरत असून काही जण यशस्वी उद्योजक आहेत अशी माहिती प्रा. धनंजय शिवपूजे यांनी दिली.

महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी महाविद्यालयामध्ये सुरू
असलेल्या विविध उपक्रमा बद्दल उपस्थितांना माहिती दिली. या मेळाव्या मध्ये उपस्थित असणार्‍याज्ञानेश्वर माळी, चित्रा कुलकर्णी, अनिकेत गायकवाड, सुरेखा चव्हाण, वैष्णवी कुलकर्णी, पुजा नवले, स्वानंद गोंजारी, अनिकेत पवार, स्वप्नील पाटील या माजी विद्यार्थ्यानी मनोगते व्यक्त केली.

महाविद्यालयातून मिळालेल्या शिक्षण व प्लेसमेंट यांच्या गुणवत्ते बद्दल सर्व विद्यार्थ्यानी समाधान व्यक्त करून विभागप्रमुख व सर्व प्राध्यापकांचे आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचाली साठी शुभेछ्या दिल्या.
सदरच्या मेळावयाचे समन्वयक म्हणून प्रा. योगेश घोडके यांनी काम पाहिले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयचे उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here