माजी आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांचा मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये संयुक्त गावभेट दौरा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांचा मंगळवेढा तालुक्यामध्ये संयुक्तपणे गावभेट दौरा आयोजित केला आहे.

सदर गावभेट दौरा गुरुवार दिनांक २१ एप्रिल २०२२ पासून सुरु होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग सापडले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले विविध नियम आणि निर्बंध यांच्यामुळे सदर गावभेट दौरा शक्य झाले नव्हते परंतु सद्य काळामध्ये कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे हे नियम शिथिल झाले आहेत. त्यामुळे हा गावभेट दौरा नियोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्यामध्ये गुरुवार, दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता देगांव, ४.३० वाजता शरदनगर, ५.०० वाजता ढवळस आणि ५.३० वाजता धर्मगांव असा कार्यक्रम असणार आहे.
शुक्रवार, दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता मुंढेवाडी, ८.३० वाजता रहाटेवाडी, ९.३० वाजता बोराळे, १०.०० वाजता नंदुर, १०.३० वाजता अरळी, ११.०० वाजता सिद्धापूर, ११.३० वाजता तांडोर, दुपारी १२.०० वाजता तामदर्डी, १२.३० वाजता माचणूर, १.०० वाजता ब्रम्हपूरी, १.३० वाजता बठाण आणि २.०० वाजता उचेठाण असा कार्यक्रम असणार आहे.
शनिवार, दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता घरनिकी, ८.३० वाजता मारापूर, ९.३० वाजता गुंजेगाव, १०.०० वाजता महमदाबाद (शे), १०.३० वाजता लक्ष्मीदहिवडी, ११.०० वाजता लेंडवे चिंचाळे, ११.३० वाजता आंधळगाव, दुपारी १२.०० वाजता गणेशवाडी, १२.३० वाजता शेलेवाडी, १.०० वाजता अकोला,१.३० वाजता कचरेवाडी आणि २.०० डोंगरगाव अशी गावभेटीची रूपरेषा असणार आहे.
 सदर गावभेट दौऱ्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांच्यासमवेत तालुका पातळीवररील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सदरील गावातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी आपल्या अडी – अडचणी व समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here