महिला भगिनी, सर्वसामान्य जनतेवरील वाढते अत्याचार तसेच सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा. -भाजपा,अ. जा. मोर्चाची राज्यपालांकडे मागणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि. २४ नोव्हेंबर:- मौजे लोणी खुर्द, ता. रिसोड, जि. वाशीम येथील दलितांवर प्राणघातक हल्ला करून अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचे पार्श्वभूमीवर आणि राज्यातील दलित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, महिला भगीनी व सर्वसामान्य जनतेला सुरक्षितता देण्यासाठी सध्याचे महाविकास आघाडी सरकार असमर्थ ठरले आहे. सध्या राज्यात कायदा, सुव्यवस्था व शांततेचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे…. अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे वतीने मोहोळचे तहसील प्रशांत बेडसे यांचे मार्फत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सादर केले आहे.
मौजे लोणी खुर्द, ता. रिसोड, जि. वाशीम येथील दलितांवर प्राणघातक हल्ला करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करण्यात येवून त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, तेथील पिडीत बांधवांचे दुसऱ्या ठिकाणी पुर्णपणे पुनर्वसन करण्यात येवून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, पिडीत कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ अर्थसहाय्य देण्यात यावे. इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडिया प्रभारी – संजीव खिलारे, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस अनिल कांबळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष नागेश क्षिरसागर, प्रमोद खिलारे, धनाजी जाधव, प्रकाश पवार, पोपट भोसले, उत्तम पवार, संजय माने इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

– संजीव खिलारे
प्रदेश सोशल मीडिया प्रभारी
भारतीय जनता पार्टी,अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here