पंढरपूर- येथे उभारण्यात येत असलेल्या नामसंकीर्तन सभागृहासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 20 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मा.आ. प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना अनेक सोयी-सुविधांबरोबरच भजन, किर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत यासाठी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व पंढरपूर नगरपरिषदकडून भव्य असा नाट्यगृहाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारकडून ऑक्टोबर 2016 मध्ये मंजूरी मिळाली होती. सुरवातीला 25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मंजूर झालेल्या निधीमधून सदर नामसंर्कितन सभागृहाचे बांधकाम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे.
कोव्हिड साथीमुळे सरकारकडून निधी न मिळाल्यामुळे मागील 3 वर्षापासून सभागृहाचे काम बंद होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, यांच्याकडे नामसंर्कितन सभागृहाच्या उर्वरित कामासाठी 45 कोटी इतका निधी मिळावा म्हणून मा.आ.परिचारक सातत्याने पाठपुरवठा करत होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार हे तिर्थक्षेत्र पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी सभागृहाच्या कामाची पाहणी केली. सभागृहाचे काम निधीअभावी अपुर्ण असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी श्री.मुनगंटीवार यांनी नामसंकिर्तन सभागृहाच्या बांधकामासाठी 31 मार्चपुर्वी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले होते.
श्री.मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे नामसंर्कितन सभागृहाचे काम अत्यंत चांगले झाले असून निधीची मागणी केली. त्यांनतर मुख्यमंत्री महादेय यांनी तातडीने 20 कोटी रूपये निधी 31 मार्चपुर्वी देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मंत्रीमहोदय यांनी फोनवरून दिली. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिकमंत्री मा.ना.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.
त्यानंतरही रू.25 कोटीची आवश्कता भासणार असून त्याचाही शासन स्तरावर पाठपुरवठा करून नामसंकिर्तन सभागृहाचे बांधकाम पुर्ण करणार असल्याचे मा.आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले.