महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नाना पटोले व प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी यावल, रावेर, मुक्ताईनगर भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना फैजपूर येथे मार्गदर्शन केले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नाना पटोले व प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी यावल, रावेर, मुक्ताईनगर भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना फैजपूर येथे मार्गदर्शन केले.

सोलापूर // प्रतिनिधी 

२८ व २९ डिसेंबर १९३६ रोजी प्रथमच ग्रामीण भागात झालेल्या कॉंग्रेसच्या फैजपूर येथील अधिवेशनाच्या स्मृतिनिमित्त उभारलेल्या भारतातील युवा पिढीला नवराष्ट्रनिर्मीतीचे आवाहन करणाऱ्या प्रेरणास्तंभाला प्रदेशाघ्यक्ष मा. नाना पटोले कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे व इतर मान्यवरांनी अभिवादन केले.

या स्तंभाचे अनावरण ११ मार्च १९८८ रोजी तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते.

यावेळी आ. शिरीष चौधरी, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, किसान काँग्रेसचे शाम पांडे, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमोद मोरे, डाॅ. उल्हास पाटील, ॲड. संजय पाटील आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here