महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १४ ते २४ जुलै शिवसंपर्क अभियान राबविणार.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १४ ते २४ जुलै शिवसंपर्क अभियान राबविणार.

 

सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १४ जुलै ते २४ जुलै पर्यंत शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे . अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे .
शिवसेना पक्षप्रमुख मा . उध्दवजी ठाकरे साहेब यांनी सर्व शिवसेना व शिवसेना प्रणित सर्व संघटनांना १२ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत . त्या आदेशावरुन व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १४ जुलै २०२१ ते २४ जुले २०२१ पर्यंत शिवसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय कामगार सेनेच्या बैठकीत घेण्यात आला . या अभियानात *१४ जुलै रोजी विडी कामगार मेळावा, १६ जुलैला घरेलु कामगार मेळावा , १ ९ जुलैला शेतमजुरांचा मेळावा , २१ जुलैला यंत्रमाग कामगार मेळावा , २२ जुलैला कलाकारांचा मेळावा आणि २४ जुलै रोजी बांधकाम व असंघटीत कामगारांचा मेळाव्याने* समारोप होणार आहे . असे बैठकीत ठरविण्यात आले . त्याचबरोबर प्रत्येक मेळाव्यामध्ये शिवसेना सदस्य फार्म भरून घेण्याचे ठरविण्यात आले .
सदर बैठकीत शिवसंपर्क अभियान राबविण्यासाठी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांची मांडलेल्या सुचना विचारात घेण्यात आले . शिवसंपर्क अभियाना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार सेनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले . शेवटी संघटनेचे सहसचिव विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी आभार माणून सदर बैठक संपल्याचे जाहिर केले .
विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विठ्ठल कुऱ्हाडकर , प्रसाद जगताप , श्रीनिवास बोगा , गुरूनाथ कोळी , गणेश म्हंता , पवित्रा कारमपुरी , अंबुबाई पेंटा , शोभा पोला , कल्पना येमुल , अनिता बटगिरी , रमेश चिलवेरी , नागार्जुन कुसुरकर , पप्पु शेख , संध्याराणी कुऱ्हाडकर यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी बंधु – भगिनी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here