महाराष्ट्रात 63 नवे न्यायाधीश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत सुबोध भैसारे राज्यात पहिला, तर रेवती बागडे मुलींमधून प्रथम आणि राज्यातून दुसरी आली आहे. परीक्षेस बसलेले 63 जण न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेला राज्यातील हजारो वकील सामोरे गेले होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांतून ही निवड प्रक्रिया राबवली गेली. यामध्ये 63 परीक्षार्थी यशस्वी झाले असून यात 38 महिला व 25 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. लवकरच त्यांची न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

सुबोध भैसारे राज्यातून प्रथम

सुबोध भैसारे हा न्यायाधीश परीक्षेत राज्यातून प्रथम आला असून तो मूळचा गोंदिया जिह्यातील आहे. दुसऱया प्रयत्नात त्याने हे यश संपादित केले आहे. त्याने कायद्याचे शिक्षण पुण्यातील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. त्याचे वडील चंद्रपूर सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत असताना सुबोधचे वास्तव्य चंद्रपुरात होते. वडिलांची अनेक ठिकाणी बदली झाल्याने सुबोध सोलापूर, नागपूर, वर्धा, बुलढाणा आदी जिह्यांतही वास्तव्यास होता.

रेवती बागडे मुलींमधून प्रथम

रेवती बागडे हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. ती मूळची पुणे जिह्यातील चाकण येथील आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश संपादित केले आहे. अत्यंत कमी वयात तिने न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. 2021 साली आय. एल. एस. विधी महाविद्यालय येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण करत अवघ्या एक वर्षात तिने हे यश मिळवले.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here