महाराष्ट्राच्या नवनिर्माणसाठी मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा:दिलीपबापू धोत्रे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्राच्या नवनिर्माणसाठी मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा:दिलीपबापू धोत्रे

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

राज्यात येत्या काहि दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक होणार आहे, या सर्व निवडणुका मनसे लढवणार असून सर्वांनी जोरात कामाला लागावे असे आवाहन जालना येथील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केले,,यावेळी जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, तसेच शेकडो युवकांनी मनसेत प्रवेश केला.

राज्यभरात मनसेकडून मेळावे आयोजित केले जात आहेत, जालना येथे सभागृहात कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील तीन पक्ष्याच्या महाविकास आघाडी सरकारने आणि केंद्रातील भाजपा सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून सामान्यांना काहीच दिलासा मिळाला नाही, फायनान्स कंपन्या आणि बँकेकडून होणाऱ्या छळवणूक बाबत सरकारने काहीच केले नाही, महावितरणकडून अनेक घरगुती तसेच शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले त्यावर ही सरकार कडून शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला नाही.
केंद्र सरकारने देखील कोणतेही मदत केली नाही ,खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागले याबाबत देखील केंद्र राज्य सरकारने काही केले नाही असे धोत्रे म्हणाले,
त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत केली, पूरग्रस्तांना मदत केली त्यामुळे जनतेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे, जिल्हा अध्यक्ष गजानन गीते, जिल्हा अध्यक्ष, बळीराम खटके, जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंखे, रवी राऊत, चव्हाण, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी,अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here