महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांना जयंती निमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांना जयंती निमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन

 

सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या विकासात मोलाचा असलेल्या तसेच पाटबंधारे क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेल्या, गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारे त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणलेल्या, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डफरीन चौकातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, NSUI जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, अशोक कलशेट्टी, भीमाशंकर टेकाळे, अंबादास गुत्तीकोंडा, देवाभाऊ गायकवाड, बसवराज म्हेत्रे, हारून शेख, प्रमिला तुपलवंडे, तिरुपती परकीपंडला, सुनील व्हटकर, सुशील बंदपट्टे, श्रीधर काटकर, उपेंद्र ठाकर, नूर अहमद नालवार, अनुपम शहा, दत्ता नामकर, चंद्रकांत टेके, बसंती साळुंखे, शोभा बोबे, जगदेवी कदम, सोपण थोरात, रमेश फुले, मुनीबाशा शेख, श्रीकांत दासरी, चंदा काळे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here