महायुतीच्या उमेदवारासाठी अभिजीत पाटील यांची प्रचार यंत्रणा सज्ज (दोन्ही मतदार संघातील समर्थकांची मनधरणी करण्याचे जोरदार काम सुरू) (गावोगावी विठ्ठलचे संचालक मंडळासह घोंगडी बैठका सुरू)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महायुतीच्या उमेदवारासाठी अभिजीत पाटील यांची प्रचार यंत्रणा सज्ज

(दोन्ही मतदार संघातील समर्थकांची मनधरणी करण्याचे जोरदार काम सुरू)

(गावोगावी विठ्ठलचे संचालक मंडळासह घोंगडी बैठका सुरू)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे नेते विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातून आपल्या सभासद आणि समर्थक यांचा पाठिंबा महायुतीचे आ.राम सातपुते आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केला आहे. केवळ पाठिंबा देवून न थांबता थेट प्रचार करण्यासाठी गावोगावी घोंगडी बैठकाचे आयोजन सुरू केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सह साखर कारखाना आणि त्यावर अवलंबून असणारा मोठा वर्ग आहे. ज्यांच्या ताब्यात हा साखर कारखाना असतो त्याच्या पाठीशी विठ्ठल परिवाराची ताकद असते, हा आजवरचा राजकीय इतिहास आहे. यामुळे चेअरमन अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना दिलेला पाठिंबा हा भाजपच्या दोन्ही उमेदवारांना हत्तीचे बळ देणारा ठरणार आहे. या पाठिंब्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे वातावरण तयार झाले आहे. श्री विठ्ठल सह साखर कारखान्यावर हजारो कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे. याच साखर कारखान्याची विस्कटलेली घडी बसविण्याचे काम चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे. याच कारखान्याला अडचणीत टाकून बाजूला गेलेल्या लोकांनी करून ठेवलेला उपद्व्याप निस्तारण्यासाठी भाजप कडून सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे अभिजीत पाटील यांनी भाजपचे उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी नियोजित सभा होत्या. त्यामुळे येत्या ५मे रोजी दुपारी १२वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या उपस्थितीत सर्व सभासद आणि समर्थक कार्यकर्त्यांची मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी प्रचाराची सांगता पूर्ण होत आहे. याच दिवशी स्वतः फडणवीस येणार असल्याने या सभेला फार मोठे महत्व येणार आहे.त्यामुळे ही शेवटचीआणि विजयी सभाच ठरणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

चौकट

जिथं आहे तिथं प्रामाणिकच: अभिजीत पाटील

आपण विठ्ठलची निवडणूक लढविली होती. यामध्ये मला या कारखान्याच्या बाबतीत वारसा नव्हता. केवळ माझ्यावर कारखाना चालविणारा माणूस म्हणून सभासदानी स्वतःचे हितासाठी आम्हाला निवडून दिले. त्या ठिकाणी आल्यावर अपेक्षा पूर्ण करून दाखविल्या. यामुळे आपणावर खा. शरद पवार यांनी विश्वास ठेवला होता. तो विश्वासही आपण सार्थकी लावला होता. तसाच विश्वास उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आपल्यावर नक्की ठेवतील आणि त्याची आपल्यालाही योग्य पोच पावती मिळेल. एवढं चांगले काम आपण महायुतीचे उमेदवारांना बळ देण्यासाठी करून दाखविणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले आहे. यामुळे आपण जिथं असणार तिथ प्रामाणिक काम करून दाखवीत वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासास नक्की पात्र राहू असे अभिवचनही त्यांनी दिले आहे.

फोटो वापरणे

चेअरमन अभिजीत पाटील

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here