“मन की बात” ही तर जन की बात- मा.आ.प्रशांत परिचारक
बलशाली भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचा देशवासीयांशी मार्गदर्शक संवाद “”मन की बात सफाई कर्मचारीयो के साथ” या कार्यक्रमाचे आयोजन मा.आ.भाई राऊळ गुजराथी कॉलनी येथे करण्यात आले होते. आजच्या “”मन की बात” 100 व्या भागात मा.पंतप्रधान यांनी देशाला विविध प्रकारचे प्रेरणादायी विचार दिले.
यावेळी परिचारक म्हणाले गेली 100 महिने देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी हे एक कुटुंब प्रमुखाच्या भुमिकेतून देशातील नागरिकांना प्रबोधन करत आहेत. वेगवेगळ्या समाज घटकातील सर्वसामान्य जनतेशी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट देशाच्या पंतप्रधानांशी संवाद साधता येतो हे याकार्यक्रमाचे वैशिष्ट अतिशय प्रेरणादायक आहे. स्वच्छता आणि सफाई कामगार हा तर पंतप्रधानांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून सातत्यांने मोदीजी हे विचार मांडत असतात.
पंढरपूर शहरातील व तालुक्यातील विविध भागात “”मन की बात” 100 वा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे मा.प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
यावेळी भाजपा मन की बात संयोजक अक्षय वाडकर, इब्राहिम बोहरी, वामन तात्या बंदपट्टे, अमोल डोके, गुरू दोडीया, काशिनाथ सोलंकी, रेवदास गोयल, माधव सोलंकी, महेश गोयल, कांतीलाल परमार, विजय वाघेला, मदन परमार, जया वाघेला, सिता गोयल, उषा गोयल, सोना सोलंकी, यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होते.