मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३४ कोटी ३१ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३४ कोटी ३१ लाख रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे

 

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ अंतर्गत मतदारसंघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या माध्यमातून ३४ कोटी ३१ लाख रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते घायाळ वस्ती या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व दर्जा सुधारणा करण्यासाठी ३ कोटी कोटी ५२ लाख रुपये, तसेच रामा १४३(फूट रस्ता)ते गादेगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी ४ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव शेलेवाडी,आसबेवाडी ते मारापूर या रस्त्यासाठी ९ कोटी ४४ लाख, दामाजी कारखाना चौक ते ब्रह्मपुरी ८ कोटी ३ लाख, मंगळवेढा ते मुंढेवाडी व ते तामदर्डी तांडोर ८ कोटी ४ लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे.

आ. आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध विकासाभिमुख योजनांतून पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी आ. आवताडे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. आ. आवताडे यांच्या रस्ते विकास अनुषंगाने विकासाभिमुख दूरदृष्टीतील कार्यात्मक भूमिकेमुळे सध्या वाहतूक रहदारीसाठी येत असलेले अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी आ. आवताडे यांनी राज्य शासनाकडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आ. आवताडे यांच्या या मागणीवरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना निधीतून सदर निधी मंजूर झाला आहे.

पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला तो मी माझ्या कामातून सार्थ ठरविणार आहे. येत्या काळात केंद्र व राज्य शासनामार्फत उर्वरित रस्ते कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार आहे. आ. आवताडे यांच्या विकास दृष्टीमुळे शासनाकडून एवढा भरीव आणि मोठ्याप्रमाणातील निधी पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विकास कामांना मिळाल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

 

कोट –

अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये वाढता संपर्क व दळणवळणाच्या सुविधा या बाबी लक्षात घेता सुव्यवस्थित व दर्जेदार रस्ते बांधणी ही काळाची गरज बनली आहे. मतदार संघातील जनतेच्या या भौतिक सुविधांचा विचार करून आमदार समाधान आवताडे हे नेहमीच सहकार्य कौशल्याने आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत असतात. आमदार अवताडे यांची ही विकासदृष्टी पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व विद्यार्थी यांना नियोजन जागी पोहोचण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे –

मोहन आप्पा बागल ( सरपंच, ग्रामपंचायत गादेगांव ता – पंढरपूर)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here